पिंपरी : पावसाने बांधकाम कामगार हवालदिल | पुढारी

पिंपरी : पावसाने बांधकाम कामगार हवालदिल

पिंपरी : पुढाी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराला कामगारनगरी ही म्हटले जाते. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या कामगारांच्या हाताला शहरात काम मिळते. परंतु, मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे बांधकाम कामगार अडचणीत आले आहेत.
या अगोदर कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कामगारांचे कामे गेल्यामुळे ते मेटाकुटीला आले होते.

अशातच पुन्हा सततच्या पावसामुळे बांधकाम कामगारांना काम मिळेनासे झाले आहे. सकाळी कसेबसे कामाला सुरुवात केली की पावसाची रिमझिम सुरू झाली की कामगारांना मिळेल तिथे निवारा घेऊनच काम करावे लागते. पुरुष कामगारांना दररोज 600 रुपये, महिला कामगारांना 500 रुपय, गवंडी कामगारांना 1200 ते 1500 रुपये याप्रमाणे हजेरी मिळते, अशी माहिती गंवडी कामगार पंडित वाघमारे यांनी दिली आहे. पंरतु संततधार पावसामुळे कामगारांना दररोज काम मिळेनासे झाले असल्याचे
त्यांनी सांगितले.

Back to top button