जिल्हा परिषदेच्या मतदार यादीचे काम स्थगित | पुढारी

जिल्हा परिषदेच्या मतदार यादीचे काम स्थगित

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कामाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पुण्यासह सातारा, सोलापूर, कोल्हापूर, परभणी आणि नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांना मतदार यादी कार्यक्रम स्थगित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपत्ती निवारण व्यवस्थापनाच्या कामात अधिकारी व्यस्त आहेत. त्याबाबत पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, नांदेड जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला होता.

Back to top button