पिंपरी : तृतीयपंथी कर्मचार्‍यांना मोफत उपचार सुविधा | पुढारी

पिंपरी : तृतीयपंथी कर्मचार्‍यांना मोफत उपचार सुविधा

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने तृतीयपंथी कर्मचारी नेमले आहेत. त्यासाठी पालिकेच्या रूग्णालय व दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुविधा मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी वैद्यकीय कार्ड त्या कर्मचार्‍यांना दिले जाणार आहे.
शहरातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालिकेने तृतीयपंथीयांना मानधनावर सुरक्षारक्षक व ग्रीन मार्शल म्हणून नियुक्त केले आहे.

तसेच, चिंचवड व दापोडी येथील दोन उद्यानाची देखभाल, नियंत्रण व दुरूस्तीचे काम देण्यात आले आहे. इतर कर्मचार्‍यांप्रमाणे ते कर्मचारी सेवा पुरवित आहेत. त्यामुळे तृतीयपंथी कर्मचार्‍यांना पालिकेच्या सर्व रूग्णालय व दवाखान्यांत उपचार सुविधा (केसपेपरसह) मोफत देण्याचा निर्णय आरोग्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी 2 जुलैच्या बैठकीत घेतला आहे.

त्यासाठी त्यांना वैद्यकीय कार्ड देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या या नव्या धोरणास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सर्वसाधारण सभेची मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या सेवेत असेपर्यंत तृतीयपंथी कर्मचार्‍यांना वैद्यकीय उपचार सुविधा मोफत मिळणार आहेत.

दरम्यान, महापालिका भवनातील तिसर्‍या मजल्यावरील पुरूषाचे स्वच्छतागृह तृतीयपंथी कर्मचार्‍यांसाठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे त्या मजल्यावरील पुरूष कर्मचार्‍यांना इतर मजल्यावरील स्वच्छतागृहात जावे लागत आहे.

Back to top button