पुणे विभागातील चार गाड्या विस्टाडोम कोचने धावणार | पुढारी

पुणे विभागातील चार गाड्या विस्टाडोम कोचने धावणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाकाळानंतर आता सुरू होणार्‍या प्रगती आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाने विस्टाडोम कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने हा निर्णय पर्यटकांना पावसाळ्यातील विविध निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता यावा, याकरिता हा निर्णय घेतला आहे.

सध्या रेल्वेच्या पुणे विभागात विस्टाडोम कोचसह डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस पुणे-मुंबई दरम्यान धावत आहेत. या गाड्यातील व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वेने विस्टाडोम कोच प्रगती आणि शताब्दी एक्सप्रेसला लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button