पुणे : सराईत चोरट्यासह दोन जणांना अटक | पुढारी

पुणे : सराईत चोरट्यासह दोन जणांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत असताना हडपसर परिसरातील वाहन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने सापळा रचून अटक केली आहे. त्यात एका सराईत वाहन चोरट्याकडून आठ गुन्ह्यांची उकल करत 7 दुचाकी जप्त
केल्या आहेत.

ऋषीकेश संतोष मोटे, रिहान सलीम शेख (वय 21) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ऋषीकेश हा सराईत गुन्हेगार आहे.
युनिट पाचच्या पथकाला ऋषीकेश व रिहान यांच्याकडे एक चोरीची दुचाकी आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबात चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे समोर आले. त्यांना अटक करून ऋषीकेश याच्याकडे सखोल तपास केला. त्या वेळी त्याने शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्याच्याकडून 7 दुचाकी जप्त केल्या. सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, अमंलदार विनोद शिवले, अकबर शेख, रमेश साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button