खगोलभौतिकी विषयामध्ये ‘एमएस्सी’ची संधी | पुढारी

खगोलभौतिकी विषयामध्ये ‘एमएस्सी’ची संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल, तर एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) यांच्या वतीने एम.एस्सी खगोलभौतिकी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी प्रवेशअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम मुदत 17 जुलैपर्यंत आहे. अभ्यासक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षी 19 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते.

यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. संशोधनाबरोबरच खगोलीय डेटा अ‍ॅनॅलिसिस, मॅनेजमेंट आदी क्षेत्रांत विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत आहे. लायगो, स्क्वेअर किलोमीटर अरे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये भारताचा सहभाग आहे. यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. प्रवेशासाठी बी.एस्सी. (द्वितीय वर्षापर्यंत गणित आवश्यक) किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत पदवी परीक्षेत किमान 55 टक्के आवश्यक आहेत. जॉइंट एन्ट्रान्स स्क्रिनिंग टेस्ट (जेस्ट 2022) च्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे.

Back to top button