पुणे मार्केट यार्डात झेंडूची आवक निम्म्यावर | पुढारी

पुणे मार्केट यार्डात झेंडूची आवक निम्म्यावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा: मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांची आवक रोडावली आली आहे. पावसाच्या संततधारेचा सर्वाधिक फटका झेंडूच्या फुलांना बसला असून झेंडूची आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात दर्जेदार फुलांचे प्रमाण कमी असून झेंडूच्या फुलांच्या दरात वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने फुलांच्या दर्जात घसरण झाली असून भिजलेल्या फुलांचे प्रमाण पन्नास टक्क्यांवर आले आहे.

आषाढ सुरू झाल्याने बाजारात फुलांना अपेक्षित मागणी नाही. बाजारात दाखल होत असलेल्या ओल्या फुलांच्या तुलनेत सुक्या फुलांना मागणी चांगली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडल्याने गत आठवड्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांचे भाव दहा टक्क्यांनी वधारले आहेत.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 40-80, गुलछडी : 30-50, अ‍ॅष्टर : जुडी 30-40, सुट्टा 100-150, कापरी : 30-60, शेवंती : 50-120, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 20-40, गुलछडी काडी : 20-50, डच गुलाब (20 नग) : 70-150, जर्बेरा : 10-30, कार्नेशियन : 100-150, शेवंती काडी 100-150, लिलियम (10 काड्या) 700-1000, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 80-120, मोगरा 600-700.

Back to top button