चाकण मार्केट यार्डमध्ये रताळ्यांची मोठी आवक | पुढारी

चाकण मार्केट यार्डमध्ये रताळ्यांची मोठी आवक

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत घट होऊनही भावात किंचित घसरण झाली. पालेभाज्यांची आवक वाढूनही पावसाच्या रिपरिपीमुळे भाव मोठ्या प्रमाणात घसरले. आषाढी एकादशीमुळे रताळ्यांची आवक वाढली. हिरव्या मिरचीची आवक स्थिर राहूनही भाव गडगडले. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1,100 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने घटून भावात 100 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 1,600 रुपयांवरून 1,500 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 2,000 क्विंटल झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने वाढली व कमाल भाव 2,000 रुपयांवर स्थिरावले. जळगाव भुईमूूग शेंगा व ओल्या भुईमूग शेंगांची विक्रमी आवक झाली. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भाव 5 हजार रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक 215 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 88 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 2,000 रुपयांपासून 4,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
कांदा – एकूण आवक – 1,100 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,500 रुपये, भाव क्रमांक 2. 1,300 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 2,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,800 रुपये, भाव क्रमांक 3. 1,600 रुपये.

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 144 क्विंटल ( 1,500 ते 2,500 रू. ), कोबी – 155 क्विंटल ( 800 ते 1,200), फ्लॉवर – 180 क्विंटल ( 1,000 ते 1,500), वांगी – 89 क्विंटल ( 1,500 ते 2,500), भेंडी – 59 क्विंटल (4 ते 5 हजार), दोडका – 56 क्विंटल ( 2 ते 3 हजार ), कारली – 46 क्विंटल (2,500 ते 3,500 रु.), दुधीभोपळा – 59 क्विंटल (500 ते 1,500 रु.), काकडी – 65 क्विंटल ( 1 ते 2 हजार), फरशी – 15 क्विंटल (दहा ते बारा हजार), वालवड – 25 क्विंटल ( 4 ते 6,500), गवार – 50 क्विंटल ( 3 ते 4 हजार), ढोबळी मिरची – 92 क्विंटल ( 3 ते 5 हजार), चवळी – 26 क्विंटल (2 ते 3 हजार), वाटाणा – 75 क्विंटल ( 8 ते 10 हजार), शेवगा – 11 क्विंटल (5 ते 6 हजार), गाजर – 55 क्विंटल ( 1,500 ते 2,500 रु.).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी – एकूण 6 हजार 950 जुड्या (1 ते 2 हजार), कोथिंबीर – एकूण 27 हजार 530 जुड्या ( 800 ते 1,200), शेपू – एकूण 3 हजार जुड्या ( 800 ते 1 हजार), पालक – एकूण 3 हजार 540 जुड्या ( 400 ते 600 रुपये).

बोकडांचे भाव वाढले
गुरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हशींच्या संख्येत घट झाली. बकरी ईदमुळे बोकडांच्या भावात वाढ झाली. एकूण उलाढाल 4 कोटी 20 लाख रुपये झाली.

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्शी गाईपैकी 30 गाईंची विक्री (15 ते 40 हजार), 50 बैलांपैकी 12 बैलांची विक्री (10 ते 30 हजार), 30 म्हशींपैकी 22 म्हशींची विक्री (20 ते 50 हजार), 2,000 शेळ्यांपैकी 1,500 शेळ्यांची विक्री (5 ते 10 हजार). बोकडांची एकूण आवक 5 हजार झाली. त्यापैकी 4 हजार बोकडांची विक्री झाली. बोकडांना 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Back to top button