पिंपरी : कोरोनाचे दिवसभरात 194 जण बाधित | पुढारी

पिंपरी : कोरोनाचे दिवसभरात 194 जण बाधित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे रविवारी (दि. 10) दिवसभरात 194 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या आकुर्डीतील रुग्णालयात सध्या 2 रुग्ण गंभीर आहेत.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 1 हजार 439 रुणांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे. आकुर्डीतील रुग्णालयात सध्या 6 बाधित रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 2 रुग्णांना गेल्या 3 दिवसांपासून ऑक्सिजन दिला जात आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

शहरात आज दिवसभरात 793 कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 3 लाख 64 हजार 178 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 58 हजार 800 रुग्ण बरे झाले आहेत.

Back to top button