शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय; पदव्युत्तर, पीएच. डी. विद्यार्थ्यांना दिलासा | पुढारी

शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय; पदव्युत्तर, पीएच. डी. विद्यार्थ्यांना दिलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पीएच. डी. आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढविलेल्या शुल्काला विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्कवाढ रद्द करून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या निर्णयानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील दहा श्रेयांक अभ्यासक्रमांसाठी 950 रुपये शुल्क आकारले जाणार असून, पीएच. डी.चे सात हजार शुल्क आकारले जाणार आहे.
विद्यापीठाकडून शुल्कवाढीचा पुर्नआढावा घेण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने शुल्कासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यार्थिहिताच्या दृष्टीने पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी 2016च्या परिपत्रकानुसार सात हजार रुपये शुल्क लागू करण्यात येत आहे, तर कोर्सवर्कचे शुल्क कोर्सवर्क प्रत्यक्षात आयोजित करण्यात येईल त्या वेळी घेण्यात यावे. तसेच श्रेयांक अभ्यासक्रमांसाठी प्रतिश्रेयांक पाचशे रुपये यानुसार एकूण पाच हजार रुपये शुल्क 2020 च्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आले होते. त्यात सुधारणा करून दहा श्रेयाकांसाठी मिळून 950 रुपये शुल्क करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button