पिंपरी :  कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.52 टक्के | पुढारी

पिंपरी :  कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.52 टक्के

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची रुग्णसंख्या सध्या वाढत आहे. दिवसाला सरासरी 200 बाधित रुग्ण आढळत आहेत. मात्र, एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणार्या रुग्णांचे प्रमाण तपासले असता 98.52 टक्के इतके आहे. त्यामुळे ही बाब दिलासादायक आहे.
कोरोनाचे शुक्रवार (दि.8) अखेर एकूण 3 लाख 63 हजार 746 बाधित रुग्ण आढळले आहेत.

त्या तुलनेत एकूण 3 लाख 58 हजार 380 रुग्ण बरे झाले आहेत. टक्केवारीत हे प्रमाण 98.52 टक्के इतके आहे. गेल्या 8 दिवसांत नव्याने 1651 बाधित रुग्ण आढळले. तर, 1203 रुग्ण बरे झाले आहेत. एका रुग्णाचा कोरानाने मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 193 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 398 कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या 44 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर, 1 हजार 428 रुग्णांवर गृहविलगी करणात उपचार केले जात आहे.

आठवडाभरातील कोरोना बाधित व बरे झालेले रुग्ण
दिनांक बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण
1  179  121
2  212  168
3  208  138
4  118  76
5  237  118
6  284  208
7  220  195
8  193  179

Back to top button