बांधकामाच्या टाकीत पडलेली गाय सुखरूप बाहेर | पुढारी

बांधकामाच्या टाकीत पडलेली गाय सुखरूप बाहेर

धनकवडी : धनकवडीतील विश्वराज विहार सोसायटीजवळील खासगी मालकीच्या बंद पडलेल्या बांधकामाच्या जमिनीखालील पाण्याच्या टाकीत चक्क गाय पडली होती. हा प्रकार भारती विद्यापीठ येथील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी (दि.8) सकाळी नऊ वाजता घडला.
घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. गॅस कटरच्या साह्याने पाण्याच्या टाक्याच्या लोखंडी जाळ्या कट करण्यात आल्या.

त्यानंतर गाईच्या शिंगाला व मागील बाजूला दोरीच्या साह्याने बांधून दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी त्या गाईला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कात्रज अग्निशामक दलाचे तांडेल महादेव मांगडे, तांडेल आनंददास, चालक गणेश भंडारे, फायरमन विजय स्वामी, प्रसाद कदम, पंकज इंगवले, प्रतीक शिर्के, नीलेश तागुंदे, धीरज जगताप, सागर शिर्के या जवानांनी पाण्याच्या टाकीतील गाईला सुखरूप वर काढले.

Back to top button