खरिपातील पिकांचा पेरा 65 टक्क्यांवर | पुढारी

खरिपातील पिकांचा पेरा 65 टक्क्यांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्यातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र 141 लाख 97 हजार 625 हेक्टर इतके आहे. त्यापैकी 65 टक्के क्षेत्रावरील म्हणजे 91 लाख 66 हजार 424 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे पेरण्यांचा टक्का वाढला असून, खरिपातील मुख्य पिके असलेल्या सोयाबीन, कापूस पिकांचा पेरा वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

खरीप हंगामात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 38 लाख 84 हजार 633 हेक्टर आहे. त्यापैकी 7 जुलैअखेरच्या ताज्या अहवालानुसार 34 लाख 52 हजार 139 हेक्टर म्हणजे सरासरीच्या 89 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर दुसरे मुख्य पीक असलेल्या कापूस पिकाखालील 41 लाख 83 हजार 801 हेक्टरइतके असून, प्रत्यक्ष पेरा 33 लाख 75 हजार 271 (81 टक्के) हेक्टरइतका पूर्ण झालेला आहे. राज्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांनी वेग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पिकांच्या पेरण्यांचा अहवाल
(क्षेत्र हेक्टरमध्ये, कंसात टक्केवारी)
भात 235249 (16 टक्के), खरीप ज्वारी 78475 (16 टक्के), बाजरी 197627 (29 टक्के), रागी 6245 (7 टक्के), मका 525906 (63 टक्के), तूर 790611 (62 टक्के), मूग 184517 (38 टक्के), उडीद 195811 (55 टक्के), भुईमूग 83765 (42 टक्के), तीळ 2317 (10 टक्के), कारळे 3089 (16 टक्के), सूर्यफुल 4752 (26 टक्के), सोयाबीन 34,52,139 (89 टक्के), कापूस 33,75,271 (81

जिल्हानिहाय पेरणी
ठाणे 7137 (12 टक्के), पालघर 9483 (9 टक्के), रायगड 10375 (9 टक्के), रत्नागिरी 30383 (33 टक्के), सिंधुदुर्ग 19575 (29 टक्के), नाशिक 330583 (50 टक्के), धुळे 290663 (70 टक्के), नंदुरबार 116330 (41 टक्के), जळगाव 568006 (75 टक्के), अहमदनगर 286522 (64 टक्के), पुणे 45674 (25 टक्के), सोलापूर 137939 (59 टक्के), सातारा 119091 (38 टक्के), सांगली 141443 (50 टक्के), कोल्हापूर 126028 (62 टक्के), औरंगाबाद 514972 (76 टक्के), जालना 470321 (78 टक्के), बीड 448068 (60 टक्के), लातूर 377968 (62 टक्के), उस्मानाबाद 326128 (66 टक्के), नांदेड 643639 (87 टक्के), परभणी 428750 (83 टक्के), हिंगोली 290556 (68 टक्के). बुलडाणा 628021 (86 टक्के), अकोला 383022 (79 टक्के), वाशिम 347948 (86 टक्के), अमरावती 505461 (72 टक्के), यवतमाळ 700054 (78 टक्के), वर्धा 312547 (70 टक्के), नागपूर 279612 (59 टक्के), भंडारा 17734 (10 टक्के), गोंदिया 7122 (4 टक्के), चंद्रपूर 222808 (50 टक्के), गडचिरोली 22461 (12 टक्के).

Back to top button