पिंपरी : घराजवळ पार्क केलेली मोटार चोरीला | पुढारी

पिंपरी : घराजवळ पार्क केलेली मोटार चोरीला

पिंपरी : घराजवळ पार्क केलेली मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी खराळवाडी, पिंपरी येथे उघडकीस आली. अमीर सिकंदर पठाण (32, रा. जहाँगीर अपार्टमेंट, खराळवाडी, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. 6) याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या सासर्‍याच्या नावावर असलेली 50 हजार रुपये किंमतीची मोटार राहत्या घराजवळील रस्त्यावर मंगळवारी (दि. 5) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पार्क केली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेसात वाजता त्यांना आपली मोटार चोरीला गेल्याचे दिसून आले.

Back to top button