कात्रज : ड्रेनेजचे पाणी ओढ्यात; नागरी आरोग्य धोक्यात | पुढारी

कात्रज : ड्रेनेजचे पाणी ओढ्यात; नागरी आरोग्य धोक्यात

कात्रज : गुजरवस्तीमधून जाणार्‍या आंंबिल ओढ्यातून मैलायुक्त दूषित पाणी वाहत असल्याने दुर्गंधीसह डास व माश्या यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात ही समस्या साथीच्या रोगाला निमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता आहे. गुजर-निंबाळकरवाडी व मांगडेवाडीपासून येणार्‍या दोन्ही ओढ्यांतून मैलायुक्त पाणी कात्रज तलावात जात असून, तलावाचे पाणी प्रदूषित होत आहे. तत्कालीन हद्दीलगतच्या गावांसाठी ओढ्यातून 10 कोटींची ड्रेनेजलाईन टाकण्यात आली. मात्र, तरीही दोन्ही ओढ्यांतून मैलायुक्त पाणी वाहत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

सोसायटीच्या ड्रेनेजलाईनला न जोडता त्या ओढ्यात सोडून दिल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी ओढ्यात मिसळत आहे. या गंभीर समस्येबाबत कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे सिध्दिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गुजर यांनी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले.

गुजरवस्तीशेजारील ओढ्यात महापालिकेने दहा कोटी रुपये खर्चून ड्रेनेज लाईन केली. तरीही सांडपाणी ओढ्यातून वाहते आहे. ओढ्यात येणारे दूषित पाणी त्वरित थांबवून महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे.

– प्रकाश गुजर, स्थानिक नागरिक

Back to top button