भोसरीत पावसाची जोरदार हजेरी | पुढारी

भोसरीत पावसाची जोरदार हजेरी

भोसरी, पुढारी वृत्तसेवा: भोसरी परिसरात पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने परिसरास तळ्याचे स्वरूप आले होते. विविध भागांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले. भोसरी परिसरात बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली. परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. यातून मार्ग काढताना नागरिकांना त्रासाचे ठरत होते.

नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यंना पाण्यातुन मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र होते. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने महापालिकेच्या अनागोंदी कारभारावर परिसरातील नागरीकांनी नाराजगी व्यक्त केली. वरुणराजाने दिलेल्या अचानक हजेरीमुळे परिसरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यावर काही काळ नागरिकांना तसेच चाकरमान्यांना काहीवेळ वाहतूक कोंडीचा सामना करवा लागला. त्याचबरोबर पीसीएमटी चौक, अंकुशराव लांडगे नाट्यगृह समोरील सेवा रस्ता, चक्रपाणी वसाहत, सावित्रबाई फुले शाळा, आदिनाथनगर, गव्हाणे वस्ती, सावित्रीबाई फुले शाळा, कुस्ती प्रशिक्षण केंद्र या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने परिसरास तळ्याचे स्वरूप आले होते.

Back to top button