पिंपरी: ताथवडे-रावेत रस्त्यावर झाडे पडली | पुढारी

पिंपरी: ताथवडे-रावेत रस्त्यावर झाडे पडली

ताथवडे, पुढारी वृत्तसेवा: ताथवडे व पुनावळे भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. संततधार व वार्‍यामुळे ताथवडे- रावे रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी वार्‍यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. ताथवडे रावेत मुख्य रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. पिंपळाच्या झाडाच्या फांद्या पावसामुळे पडल्या आहेत.

ताथवडे- रावेत रस्ता रहदारीचा आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या संबंधित विभागाने झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे गरजेचे होते; मात्र याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. उद्यान विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अशी धोकादायक फांद्या काढाव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Back to top button