जि. प. आणि पं. स.साठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर | पुढारी

जि. प. आणि पं. स.साठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर

पुणे : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदारयाद्या 18 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 22 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदारयाद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

या जिल्हा परिषदांतर्गत निवडणूक

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

Back to top button