पुणे: बनावट दस्तऐवज; बिल्डरचा जामीन फेटाळला | पुढारी

पुणे: बनावट दस्तऐवज; बिल्डरचा जामीन फेटाळला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: खोटे बांधकाम नकाशे आणि बनावट ‘कमेन्समेंट सर्टिफिकेट’ तयार करून वेगवेगळ्या घर खरेदीदारांसोबत दस्त नोंदणी करून त्यांची फसवणूक केली. तसेच सहकारी बँक व पतसंस्थेकडून कंपनीचा संचालक असल्याचे प्रमाणपत्र घेत कर्ज काढून कंपनीची 4 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी हा आदेश दिला.

दीपक यशवंत पाटील (वय 57, रा. कोथरूड) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह कर्ज देणार्‍या सहकारी बँक व पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधातही चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 डिसेंबर 2020 पासून गुन्हा दाखल होईपर्यंत बालेवाडी येथील संबंधित बांधकाम कंपनीच्या मिळकतीच्या ठिकाणी घडला. या गुन्ह्यात आरोपी दीपक पाटील याने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्याला सहायक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला.

Back to top button