पिंपरी : कडी कोयंडा उचकटून एक लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

पिंपरी : कडी कोयंडा उचकटून एक लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी : दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील 99 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी उघडकीस आली. ज्ञान रौनक अजय प्रताप सिन्हा (34, रा. विशालनगर पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचे घर रविवारी (दि. 3) रात्री दहा ते सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या कालावधीत बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या लग्नात मिळालेल्या तीन सोन्याच्या अंगठ्या, एक प्लॅटेनियमची अंगठी आणि एक मोबाईल फोन असा 99 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Back to top button