अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार | पुढारी

अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अ‍ॅसिड टाकून कुटुंबीयांना जिवे मारू, अशी धमकी देऊन महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही, तर महिलेला पर्वती पायथा परिसरातील कालव्यात ढकलून देऊन तिच्या खुनाचा प्रयत्नदेखील करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंदा पाटील (वय 56) विरुद्ध दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पाटील आणि पीडित महिलेची ओळख होती. पाटील याने फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार जर कोणाला सांगितला, तर अ‍ॅसिड टाकून कुटुंबीयांना जिवे मारू, अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच महिलेला पर्वती पायथा परिसरातील कालव्यात ढकलून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक मुळीक तपास करत आहेत.

 

Back to top button