
पुणे : पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी तक्रार देण्यास गेल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मासे विक्रेत्याने न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती.
भारत बंद आहे तुझे मासे विक्रीचे दुकान बंद कर म्हणत माजी आमदाराने दादागीरी करत शिवीगाळ केल्याने दाद मागण्यासाठी पोलिस स्थानकात गेलेल्या फिर्यादीला पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केली होती मारहाण होती. त्या दरम्यान हा प्रकार घडला होता.
हेही वाचा