पिंपरी : पेट्रोल देण्यास नकार दिल्याने खुनी हल्ला | पुढारी

पिंपरी : पेट्रोल देण्यास नकार दिल्याने खुनी हल्ला

पिंपरी : गाडीतले पेट्रोल देण्यास नकार दिल्याने एकावर चाकूने खुनी हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी मंगेश आण्णा शिंदे (33, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, नितीन उर्फ काळू रामदास कराळे (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड), अक्षय पाटील (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) आणि एक अनोळखी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नितीन याने फिर्यादी यांना त्यांच्या गाडीतले पेट्रोल मागितले. मात्र, पेट्रोल देण्यास फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, आरोपी नितीन याने फिर्यादीवर चाकूने वार करीत फिर्यादीवर खुनी हल्ला केला.

Back to top button