लाचखोर उपायुक्तासह पत्नीला पोलिस कोठडी | पुढारी

लाचखोर उपायुक्तासह पत्नीला पोलिस कोठडी

पुणे : उत्पन्नापेक्षा 31.59 टक्के म्हणजे तब्बल एक कोटी रुपयांची अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागातील उपायुक्तासह पत्नीला नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी दिला. विजय भास्कर लांडगे (वय 49) असे उपायुक्ताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडून (एसीबी) अटक करून दोघांना न्यायालयात हजर केले.

त्या वेळी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली.
त्यांच्या घरझडतीमध्ये कागदपत्रे मिळाली आहेत. त्या अनुषंगाने तपास करायचा आहे. नातेवाइकांच्या नावावर संपत्ती लपविली आहे का, त्यांचे लॉकर आहेत का, याच्या शोधासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Back to top button