आता शनिवार, रविवारीही शालेय वाहनांचे पासिंग; वाहतूकदारांना दिलासा | पुढारी

आता शनिवार, रविवारीही शालेय वाहनांचे पासिंग; वाहतूकदारांना दिलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शालेय वाहनांचे पासिंग आता वाहनचालकांना शनिवारी आणि रविवारी सरकारी सुटीच्या दिवशीसुध्दा करता येणार आहे. त्याकरिता आरटीओकडून शनिवारी आणि रविवारी कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शालेय वाहतूक जोरात सुरू झाली आहे. जवळपास 5 हजार वाहनांमार्फत शहरात शालेय वाहतूक पुरविली जात आहे. मात्र, अद्याप यातील 30 ते 40 टक्के शालेय वाहतूकदारांनी आपली वाहने पासिंग केलेली नाहीत.

यातच अनेक वाहनचालक गाडी पासिंग न करताच शालेय विद्यार्थी वाहतूक पुरवत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय वाहनाचे तातडीने पासिंग करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले असून, आरटीओकडून सुटीच्या दिवशीसुध्दा शालेय वाहनांचे पासिंग करून देण्यात येणार आहे. तसेच, विनापासिंग शालेय वाहन सापडल्यास या वाहनावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button