वाकडमध्ये अनधिकृत बांधकामावर हातोडा | पुढारी

वाकडमध्ये अनधिकृत बांधकामावर हातोडा

वाकड : पुढारी वृत्तसेवा : परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून मंगळवारी कारवाई करण्यात आली.
वाकड प्रभाग क्रमांक 26 मध्ये अंदाजे 2500 चौरस फुटांमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई ड प्रभागाच्या पथकामार्फत करण्यात आली.

क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईमध्ये स्थापत्य अभियंता जय कानडे, अमरजित मस्के, गौरव शिंदे, अतिक्रमण निरीक्षक नितीन कदम उपस्थित होते. कारवाई दरम्यान, 25 महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान व 17 स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Back to top button