तळेगाव स्टेशन : तळेगाव परिसरात जोरदार पावसाची बॕटींग | पुढारी

तळेगाव स्टेशन : तळेगाव परिसरात जोरदार पावसाची बॕटींग

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरात रात्रभर रिपरिप चालु होती.पहाटे पासून सकाळपर्यंत संततधार पाऊस पडत होता.पावसामुळे तळेगाव स्टेशन भागात इंद्रायणी कॉलनी,मनोहर नगर ,वतन नगर,यशवंत नगर,स्टेशन चौक, आदी उपनगरातील रस्त्यांवर आणि खड्डयांत पाणीचपाणी साचले होते.

वाहन चालकांना पाण्यातून खड्डे चुकविणेसाठी कसरत करावी लागत होती.वाहनांचे उडालेले पाणी अंगावर उडू नये यासाठी पायी चालणा-यांची तारांबळ उडत होती पाणी अंगावर आल्यानंतर पादचारी आणि वाहनचालक यांच्यात किरकोळ बाचाबाची होत होती.पावसामुळे बळीराजा आणि पर्यटन व्यावसायिक मात्र सुखावले असून आणखी अशाच पावसाचे प्रतिक्षेत आहे.

Back to top button