पिंपरी : रेल्वे बोगद्याला आले तळ्याचे स्वरूप | पुढारी

पिंपरी : रेल्वे बोगद्याला आले तळ्याचे स्वरूप

पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्टेशन ते धर्मराज चौक व तहसील कार्यालयापासून वाल्हेकरवाडीकडे जाणार्‍या मार्गात पावसाचे पाणी साचल्याने बोगद्याला तळ्याचे स्वरूप आले होते. गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची दमछाक झाली होती. दरवर्षी प्रमाणे या बोगद्याची अवस्था सारखीच असते.

पावसाळा सुरू झाला की वाहन चालकांना हा रस्ता पार करताना नाकी नऊ येतात. शहरात सोमवार पासून सुरू असलेल्या पावसामुळे आकुर्डी येथील दोन्ही बोगद्यात पाणी साचले होते. धर्मराज चौकाकडे जाणार्या बोगद्याला मिळणार्या गटारीत कचरा अडकल्याने बोगद्यात अधिकच पाणी तुंबले होते. त्यामुळे महापालिका कर्मचारी पावसात आपली कामे करीत होते.

मात्र जेव्हा बोगद्याचे बांधकाम करण्यात आले तेव्हा, योग्यरितीने आऊटलेट न काढल्याने सर्व पाणी बोगद्यात साचत असल्याची तक्रार येथील स्थानिक करीत आहेत. तसेच साचलेल्या पाण्यातून वाहने गेल्यानंतर दुचाकी चालक व पादचार्‍यांच्या अंगावर घाण पाणी उडाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत. वाहनांच्या सायलेंसरमध्ये पाणी गेल्याने वाहनांमध्ये बिघाड होत

Back to top button