पिंपरी : मोबाईल खरेदीवर सवलत देण्याच्या बहाण्याने गंडा | पुढारी

पिंपरी : मोबाईल खरेदीवर सवलत देण्याच्या बहाण्याने गंडा

पिंपरी : मोबाईल खरेदीवर सवलत मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेला 55 हजारांचा गंडा घालण्यात आला. ही घटना 24 ते 30 एप्रिल या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 4) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वेदांतसिंग नवीनसिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी वधुवर सूचक मंडळाच्या व्हाट्सअप ग्रुपवर आपला बायोडाटा शेअर केला होता. त्यामुळे आरोपीशी त्यांची ओळख झाली. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना मोबाईल खरेदीवर 50 टक्के सवलत मिळवून देतो, असे खोटे सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 55 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. त्यानंतर मोबाईल न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Back to top button