दहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद | पुढारी

दहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला दत्तवाडी पोलिसांनी सिंहगड रस्ता परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 2 काडतुसे जप्त करण्यात आली. मनीष प्रकाश घडशी (वय 22, रा. सानेगुरुजीनगर, आंबिल ओढा वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. परिसरात दहशत माजविण्यासाठी घडशीने पिस्तूल बाळगल्याची माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार कुंदन शिंदे, दत्ता मरगळे, अमीर पटेल, अमित सुर्वे यांना मिळाली.

त्यानुसार भंडारी हॉटेलजवळ सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button