मोशीतील बसथांब्यालाच केले पार्किंग | पुढारी

मोशीतील बसथांब्यालाच केले पार्किंग

पिंपरी : मोशी स्पाईन रस्त्यावरील बसथांब्यासमोरच नागरिक दुचाकी वाहने उभी करत असल्यामुळे प्रवाशांना अडथळा होत आहे. त्यामुळे बेशिस्तपणे वाहने पार्क करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मोशी स्पाईन रस्त्यावरील बसथांबा सुरू आहे. तरीदेखील याठिकाणी चालक बेशिस्तपणे वाहने पार्क करुन जातात.

यामुळे बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना अडथळा होत आहे. त्यामुळे बसथांबा असूनही प्रवाशांना रस्त्यावर उभे राहवे लागत आहे. आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बस थांब्यासमोर वाहने लावणार्‍यांवर कारवाई करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button