व्यापार्‍याला मागितली एक कोटीची खंडणी | पुढारी

व्यापार्‍याला मागितली एक कोटीची खंडणी

शिरूर : पुढारी वृत्तसेवा: शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स व्यापारी वैभव खाबिया यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञाताकडून धमकीचा फोन आल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैभव दिलीप खाबिया (वय 46, रा. नवीन नगरपालिकेसमोर पाबळ फाटा, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव खाबिया यांचे शिरूर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी (दि. 4) सकाळी 11:18 वाजता खाबिया यांच्या दुकानात ते असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन व टेक्स्ट मेसेज करून मी डी. के. ग्रुपमधुन बोलतोय, तू मला खंडणी म्हणून 1 कोटी रुपये दिले नाही तर मी तुझा व तुझ्या कुटुंबाचा गेम वाजवणार, तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून खंडणी मागितली. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

Back to top button