संगनमत करून सोन्याची साखळी लंपास | पुढारी

संगनमत करून सोन्याची साखळी लंपास

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राठोड ज्वेलर्स दुकानातील वरिष्ठ सेल्समन, बॅक ऑफिस अकाउंट असिस्टंट, तसेच सेल्समन महिला यांनी संगनमत करून दुकानातील दोन लाखांची सोन्याची साखळी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तिघांना अटक केली.

अमित राजू खडके (24, रा. वानी नगर, पिंपळे गुरव, पुणे), भवर जवानाराम बोराना आणि विक्रमसिंग संपतसिंग राठोड (दोघेही रा. दसुर जि. झालुर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत संजय राठोड (51, रा. मुकुंदनगर, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 जुलै रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नित्यानंद कॉम्प्लेक्स येथील राठोड ज्वेलर्समध्ये घडला.

Back to top button