पाणीकपातीवर तक्रारींचा पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पाणीबचतीसाठी महापालिकेने अवलंबिलेल्या पाणीकपातीवर कपातीच्या पहिल्या दिवशी शहरातून एकही तक्रार महापालिकेस प्राप्त झाली नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी मंगळवारी शहराच्या मध्य भागातून तक्रारींचा पाऊस पडला. पावसाने ओढ दिल्याने खडकवासला धरण साखळीमध्ये दरवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या सूचनेवरून महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. पाणीकपातीचा सोमवार हा पहिला दिवस होता. पाणीकपातीच्या पहिल्या दिवशी बहुतांश उपनगरांमधील पाणीकपात करण्यात आली होती.

उपनगरांमध्ये कायमच पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे पाणीकपातीवरून कोणी तक्रारी केल्या नाहीत. मात्र, पाणीटंचाईची फारशी झळ न पोहोचणार्‍या शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवल्याने महापालिकेत तक्रारींचा पाऊस पडला. महापालिका प्रशासनाने जाहीर करूनही पाणी आले नाही, म्हणून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

आज पाणी न येणारा शहरातील परिसर
संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, वाघजाईनगर, अटल अकरा हनुमान नगर, जांभूळवाडी रोड, बालाजीनगर संपूर्ण परिसर, महादेवनगर, कात्रज संपूर्ण परिसर, कोंढवा बु. संपूर्ण परिसर, बिबवेवाडी, तळजाई, लोअर इंदिरा नगर, अप्पर, पद्मावती, चव्हाणनगर, अप्पर पंपिंग परिसर, खामकर वस्ती, शिवदर्शन, पर्वती दर्शन, महर्षिनगर, आदिनाथ सोसायटी, सहकारनगर, जनता वसाहत, मुळा रोड, खडकी कॅन्टोमेंट, औंध, सकाळ नगर, बाणेर, रामबाग कॉलनी, शिवाजीनगर, कोथरूड, जय भवानी नगर, किष्कींधा नगर, पौड रस्ता, केळेवाडी, सुतारदरा, एमआयटी कॉलेज, शास्त्रीनगर, आनंद नगर, वनदेवी मंदिर, श्रमिक नगर, बावधन बु., भुसारी कॉलनी, मयूर कॉलनी, करिष्मा सोसायटी परिसर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, कर्वे नगर, अहिरेगाव, धानोरी गावठाण, लोहगाव रस्ता, मुंजाबा वस्ती, खेसे पार्क, खराडी, नगर रस्ता, आपले घर, ईऑन आयटी पार्क, वडगाव शेरी, हडपसर, गोंधळेनगर, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, रामटेकडी, लुल्लानगर, कोंढवा खु., पुणे कॅन्टोमेंट.

Exit mobile version