पुणे जिल्ह्यात 50 मिमीपेक्षा जास्त पावसाचा इशारा | पुढारी

पुणे जिल्ह्यात 50 मिमीपेक्षा जास्त पावसाचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात 6 ते 9 जुलै या आगामी चार दिवस 50 मिमीपेक्षा जास्त म्हणजेच मुसळधारचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत घाटमाथ्यासह पुणे शहर, पिंपरी -चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा मंगळवारी दिला आहे. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या चोवीस तासांत सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस झाला आहे. आगामी चार दिवसांत 60 ते 99 मिमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा दिला आहे.

पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी दिवसभर अधूनमधून हलक्या पावसाने हजेरी लावली. 11 जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. शहरात पडत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते.

24 तासांत जिल्हयात झालेला पाऊस (मिमीमध्ये)
लोणावळा 98.5, लवासा 77, गिरीवन 32, एनडीए 27, तळेगाव 20, वडगावशेरी 18.5, इंदापूर 14.5, मगरपट्टा 13.5, लवळे 10, शिवाजीनगर 8.2, निमगिरी 7.5, दुदलगाव 7.5, पुरंदर 7, माळीण 4, चिंचवड

Back to top button