तळेगाव: मावळात जोरदार पावसाची प्रतीक्षा | पुढारी

तळेगाव: मावळात जोरदार पावसाची प्रतीक्षा

तळेगाव स्टेशन : गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मावळात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते; मात्र जुलै महिना सुरू होवूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. अनेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. पेरणीची कामे रखडली आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण होत आहे. भात लावणीसाठीचे दहाड सुकायला लागले आहे.

पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे झाली आहेत; परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे नंतरची कामे खोळंबली आहेत. पवना धरणातील पाण्याची पातळी घटली आहे. मावळ भाग इंद्रायणी भात पीकाचे आगार म्हणून ओळखले जाते; परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Back to top button