पिंपरी : तेवीस लाखांच्या बांधकाम साहित्याची परस्पर विक्री | पुढारी

पिंपरी : तेवीस लाखांच्या बांधकाम साहित्याची परस्पर विक्री

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: तेवीस लाख 40 हजारांच्या बांधकाम साहित्याची विक्री करून एकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 4 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडला. सतीश रंगनाथ मुळे (42, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर), प्रफुल दत्तात्रय मुळे (30, रा. चिखली), रोहिदास शंकर मंजुळ (30, रा. जाधववाडी रांजणी, ता. आंबेगाव), अभिजित जयराम वाघ (30, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर), बाळासाहेब कृष्णाजी गावडे (30, रा. येडगाव, ता. जुन्नर), सतीश भानुदास मकर (30, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी प्रशांत पद्मनाभ शेट्टी (37, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एक हजार 775 सेंट्रिंग लोखंडी प्लेट, 745 सेंट्रिंग लोखंडी वासे, 35 लोखंडी चॅनल, असे 23 लाख 40 हजारांचे बांधकाम साहित्य नेले. दरम्यान, ते साहित्य बांधकामासाठी न वापरता त्याची परस्पर विक्री केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button