पुणे : सराटी येथे तुकाराम महाराज पादुकांना नीरा स्नान | पुढारी

पुणे : सराटी येथे तुकाराम महाराज पादुकांना नीरा स्नान

बावडा : पुढारी वृत्तसेवा : सराटी (ता. इंदापूर) येथे नीरा नदी पात्रात संत श्री तुकाराम महाराज पादुकांना परंपरेनुसार नीरा स्नान घालण्याचा विधी उत्साही व भक्तीमय वातावरणात मंगळवारी (दि. ५) सकाळी झाला. त्यानंतर सकाळी ८ वाजता जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्यास पुणे जिल्ह्यातून निरोप दिला.

Video: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; वाहतुकीवर परिणाम

पालखी सोहळ्याचा सोमवारी (दि. ४) रात्रीचा मुक्काम नीरा नदी काठी वसलेल्या सराटी गावी होता. त्यानंतर सकाळी पादुकांना सोहळा विश्वस्त व ग्रामस्थांनी फुले अंथरलेल्या रस्त्यावरून वाजत-गाजत नीरा नदी पात्रात नेऊन विधीवत मंत्रोपचारात शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत स्नान घातले. निरा नदीवर पूर्वी पूल नसताना कोळी बांधव हे पालखीस होडीतून नदी पार करण्यास मदत करीत असत. त्याची उतराई म्हणून पादुका स्नान विधीनंतर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा विश्वस्तांच्या वतीने कोळी बांधवांचा व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन रथामध्ये ठेवून सोहळ्यास निरोप दिला.

Virat Kohli : विराट कोहलीच्या ‘जोश’ पुढे सर्वच फिके! (Video)

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, सरपंच पै. बापूसाहेब कोकाटे, उपसरपंच सचिन कोकाटे, सुरेश जगदाळे, बाबासाहेब कोकाटे व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्यासह इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सराटी ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह निरा नदी पार करून ग्रामीण पोलिस दलाने पालखीस निरोप देत सुरक्षेचा ताबा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्द केला.

Mob Lynching : करणीच्या संशयातून जमावाने केला वृद्धेचा खून

Back to top button