पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी त्रिकूट जेरबंद | पुढारी

पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी त्रिकूट जेरबंद

पुणे : जबरी चोरी करणार्‍या त्रिकुटाला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी असा 55 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. साजिद दिलावर सय्यद (वय 21), राजन रघुनाथ लावंड (वय 30), ओम विनोद भंडारी (वय 21, तिघेही रा. माळवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

19 जून रोजी रात्री घरी निघालेल्या होते. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, तपास करीत जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसर येथे असल्याची माहिती पोलिस कर्मचारी किरण घुटे, दत्ता शिंदे आणि तुषार खराडे यांना मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, कर्मचारी कैलास डुकरे, गणेश वाघ, अनिल शिंदे यांच्या पथकाने माळवाडी परिसरातून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला होता. त्याचवेळी प्रसंगावधान राखत पथकाने तिघांना पाठलाग करून पकडले.

Back to top button