थकीत बिलाचे पैसे मागितल्याने खुनाचा प्रयत्न | पुढारी

थकीत बिलाचे पैसे मागितल्याने खुनाचा प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डेकोरेशन केलेल्या कामाच्या थकीत बिलाचे पैसे वारंवार फोन करून मागितल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर दगड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव सौरभ शिंदे आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत अजिंक्य कांबळे (वय 25, रा. धायरी गाव) याने फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री दहाच्या सुमारास दुर्गाकृपा हॉटेलसमोर (बेनकरवस्ती, धायरी) घडली.

फिर्यादी कांबळेंचा मित्र सौरभने आरोपींकडे डेकोरेशन केलेल्या कामाच्या थकीत बिलाचे पैसे फोन करून अनेकदा मागितले होते. त्याचा आरोपीला राग आला होता. त्याच कारणातून पाच जणांच्या टोळक्याने शिंदेला जिवे मारण्याच्या उद्देशाने गैर जमाव एकत्र करून, त्याला दगड आणि चाकूने मारहाण केली. त्यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सहायक पोलिस उपनिरीक भरत चंदनशिवे यांनी दिली.

Back to top button