बाणेर : बस सुरक्षेसंदर्भात पालकांची तक्रार | पुढारी

बाणेर : बस सुरक्षेसंदर्भात पालकांची तक्रार

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे (पाडाळे) येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी पुरविण्यात आलेल्या बसच्या सुरक्षेसंदर्भात आक्षेप घेत शेकडो पालक शाळेत जमा झाले होते. शाळेकडून आधीच पैसे जमा करून घेतले गेले. परंतु, विद्यार्थ्यांना सुरक्षित अशा बस पुरविण्यात आलेल्या नाहीत, असे काही पालकांनी सांगितले.

विशेष म्हणजे, या बसमध्ये मुलांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी कर्मचारी असणे आवश्यक असताना अशा जबाबदार असलेल्या कुणालाच न पाठवता केवळ चालकाच्या जबाबदारीवर बस पाठविण्यात येत आहेत. यामुळे पालकांनी थेट शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार करीत अशा प्रकारे मुलांना शाळेत आणणे धोकादायक असल्याची तक्रार नोंदविली. तरी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलनेे योग्य ती दखल घेत वाहतूकव्यवस्था व्यवस्थित करावी. मुलांच्या सुरक्षेचा विचार करावा, अशी मागणीदेखील समोर येऊन पालकांनी केली आहे.

Back to top button