पुणे : अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई | पुढारी

पुणे : अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

पुणे : औंध येथील सांगवी रस्त्यावरील आरक्षित जागेवरील 70 अनधिकृत दुकानांवर महापालिकेने सोमवारी (दि. 4) कारवाई केली. बांधकाम विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेत प्रशासकराज आल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे, यावर मोठ्या प्रमाणात कारवाईची मोहीम सुरू आहे.

या कारवाईअंतर्गत औंध येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर उभारण्यात आलेली जवळपास 70 दुकाने हटविण्यात आली. या कारवाईसाठी एक महिन्यापूर्वी नोटीस देण्यात आली होती. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुधीर कदम, उपअभियंता सुनील कदम, दत्तात्रय टकले, राहुल रसाळे, समीर गड यांनी कारवाई केली.

Back to top button