मुलांना कर्तव्याचा विसर पडल्याने वृद्धाश्रम वाढले; प्रा. यशवंत गोसावी यांचे प्रतिपादन | पुढारी

मुलांना कर्तव्याचा विसर पडल्याने वृद्धाश्रम वाढले; प्रा. यशवंत गोसावी यांचे प्रतिपादन

हडपसर : पुढारी वृत्तसेवा: ‘जन्मदात्या आई-वडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले. त्यांचा सांभाळ करणे हे मुलांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, त्याचा विसर मुलांना पडत चालल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे,’ असे मत शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले.
हडपसर येथील नेताजी मंगल कार्यालयात शिववंशीय दशनाम गोसावी समाजाच्या वतीने शालेय साहित्य भेट व मार्गदर्शन शिबिरामधे प्रा. गोसावी बोलत होते. या वेळी ससूनचे प्रा. डॉ. अनिल गोसावी, सूर्यकांत गिरी, पश्चिमचे युवा अध्यक्ष पंकज भारती, संस्थापक अध्यक्ष शिवसंभा गोसावी, प्रदेशाध्यक्ष सुदाम गोसावी, संदीप भारती, प्रकाश भारती, राजकुमार गोसावी आदी उपस्थित होते.

शिववंशीय दशनाम गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाबरोबर विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ‘समाजात गरीब-श्रीमंत दरी वाढत असून, सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे माणसांविषयीची आपुलकी कमी होत आहे. याला थोपवायचे असल्यास अहंकार, गर्व बाजूला ठेवून निरपेक्ष वृत्तीने सेवा करा, यातून मनाला समाधान मिळेल,’ असा विश्वास शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी व्यक्त केला.

Back to top button