प्रारूप मतदार यादीवर 4 हजार 273 हरकती अंतिम मतदार यादी 9 जुलैला | पुढारी

प्रारूप मतदार यादीवर 4 हजार 273 हरकती अंतिम मतदार यादी 9 जुलैला

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल 4 हजार 273 हरकती आल्या आहेत.
सर्वाधिक 886 हरकती बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या असून, सर्वाधिक कमी 42 इतक्या हरकती औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या आहेत. मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार महापालिकेने 24 जूनला प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यावर हरकती दाखल करण्यासाठी 3 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

दरम्यान, या प्रारूप मतदार यादीत मतदारांच्या नावांमध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामध्ये एका प्रभागातील नावे दुसर्‍या भागात लावल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच, अनेक प्रभागांमध्ये शहराबाहेरील म्हणजेच जिल्ह्यातील काही गावांमधील मतदारांची यादी घुसविण्यात आल्याचा प्रकारही उजेडात आला. त्यावर भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार आयुक्तांनी प्रभागनिहाय अधिकार्‍याच्या नेमणुका केल्या आहेत. 9 जुलैला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय आलेल्या हरकती
औंध-बाणेर 42
भवानी पेठ 57
बिबवेवाडी 886
धनकवडी-सहकारनगर 552
ढोले-पाटील 277
हडपसर- मुंढवा 120
कसबा-विश्रामबाग 49
कोंढवा -येवलेवाडी 438
कोथरूड-बावधन 280
नगर रोड -वडगाव शेरी 333
शिवाजीनगर-घोले रोड 89
सिंहगड रोड – 524
वानवडी -रामटेकडी 143
वारजे-कर्वेनगर 426
येरवडा-कळस-धानोरी 57

Back to top button