पिंपरी : पंधरा लाखांची फसवणूक | पुढारी

पिंपरी : पंधरा लाखांची फसवणूक

पिंपरी :  बँक बेनिफिशरी अकाउंट अ‍ॅड करून अकाउंटचा कस्टमर आयडी व पासवर्ड हॅक करून पंधरा लाखांची फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी व शुक्रवारी घडली.

फिर्यादी अविराज अशोक पाटसकर (वय 45, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्या आईचे स्पार्क इंजिनिअर्स कंपनीच्या नावाने असलेल्या बँक अकाउंटला अनोळखी व्यक्तिने बेनिफिशरी अकाउंट अ‍ॅड करून पासवर्ड व आयडी हॅक केला. यानंतर त्यांच्या संमतिशिवाय पंधरा लाख रुपये दुसर्‍या अनोळखी अकाउंटवर ट्रान्सफर केले.

Back to top button