पिंपरी : घरासमोरूनच ट्रक चोरीला | पुढारी

पिंपरी : घरासमोरूनच ट्रक चोरीला

पिंपरी : चिखलीमधील कुदळवाडी येथून घरासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेला ट्रक चोरीस गेला आहे. ही घटना शनिवारी (2 रोजी) स. 10 ते 11 वाजेच्या दरम्यान घडली आहे.

फिर्यादी महंमद जिकरी खान (वय 52, रा. कुणाल बिल्डिंग, चिखली) यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेला एमएच 04 एफ जे 6834 या क्रमांकाचा अडीच लाख रूपये किमतीचा ट्रक चोरट्यांनी पळविला आहे. फिर्यादीने शनिवारी सायकाळी सहा वाजता चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कलम 379 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे

Back to top button