मंचर : मळगंगा देवीच्या मंदिरात चोरी | पुढारी

मंचर : मळगंगा देवीच्या मंदिरात चोरी

मंचर : चिंचोली कोकणे (ता. आंबेगाव) येथे मळगंगामातेच्या मंदिरातील दानपेटीतील तीन हजार रुपये रक्कम चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. मळगंगामात मंदिराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून गाभार्‍यात असलेली दानपेटी फोडून त्यातील तीन हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे.

याबाबतची फिर्याद ज्ञानेश्वर तुकाराम कोकणे (वय 71, रा. चिंचोली, कोकणे) यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. तपास पोलिस हवालदार बी. एस. सुरकुले करीत आहेत.

Back to top button