स्नेहल जाधवला खो-खो स्पर्धेत सुवर्ण | पुढारी

स्नेहल जाधवला खो-खो स्पर्धेत सुवर्ण

पारगाव : पुढारी वृत्तसेवा: पंजाब येथे भारतीय खो-खो महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अल्टिमेट खो-खो स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्र डियर्स या संघाने सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र डियर्स या संघात आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील स्नेहल अंकुश जाधव हिचा समावेश होता. स्नेहल ही रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळ येथे राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

सध्या स्नेहल रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला असून तिने जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय आजपर्यंत महाराष्ट्र संघातून एकूण आठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळली आहे. स्नेहलने दोन वेळा वरिष्ठ व सहा वेळा शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रीय अल्टिमेट खो-खो या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल स्नेहलचे परिसरातून कौतुक होत आहे.

Back to top button