पेठमध्ये महसूलच्या 651 प्रकरणांचा निपटारा : तहसीलदार रमा जोशी | पुढारी

पेठमध्ये महसूलच्या 651 प्रकरणांचा निपटारा : तहसीलदार रमा जोशी

मंचर : पुढारी वृत्तसेवा; पेठ (ता. आंबेगाव) येथे महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालत आणि संलग्न विविध महसूल कामकाजाबाबत एकूण 768 पैकी 651 प्रकरणांचा निपटारा केल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली. अर्धन्यायिक प्रकरणी फेरफार नोंदी, मंडलाधिकारी स्तरावरील प्रलंबित संदर्भ, संजय गांधी योजना मतदार नोंदणी, पुरवठा विषय काम, विविध प्रकारचे दाखले देण्यात आले.

तालुक्यातील पाचही मंडळ स्तरावर जून महिन्याच्या दर बुधवारी सदर अभियान राबवले. एकूण 2656 प्रकरणांपैकी 2206 संदर्भ जागीच निर्गत केले. आंबेगाव तालुक्यातील सर्व नागरिक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी वर्ग, महा-ई-सेवा चालक, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित जागा उपलब्ध करून देणारे विद्यालय संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, ग्रामसचिवालय विभाग या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Back to top button