लूटमार करणार्‍या दोघांना अटक | पुढारी

लूटमार करणार्‍या दोघांना अटक

चाकण : कामगाराला लुटणा-या चोरट्यांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली. दीपक नेटके (वय 29, रा. मेदनकरवाडी ता. खेड) व सौम्यरंजन शाहो (वय 25, रा. मोशी) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार श्रीनिवास गायकवाड हे रात्री
पावणेबाराच्या सुमारास कंपनी सुटल्यावर घरी पायी निघाले होते. त्यावेळी दूचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने पळवून नेला.

त्यानंतर गायकवाड यांनी महाळुंगे पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता वोक्सवॅगन कंपनी ते महिंद्रा कंपनी या रोडवर मोटारसायकलवरील दोघे जण रस्त्याने ये-जा करणा-या लोकांची संशयास्पदरीत्या टेहळणी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पोहचले असता दोघे संशयित महिंद्रा कंपनीच्या दिशेने मोटरसायकलवरून पळून जाऊ लागले. त्यांनी कॅपिटल सिटी सोसायटी येथे मोटरसायकल थांबवली. मागे बसलेला संशयित सोसायटीच्या पार्किंगकडे पळत जाऊन लपून बसला. स्थानिकांच्या मदतीने पकडून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले

 

 

 

 

 

 

 

 

Back to top button